मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

एका भरकटलेल्या मनाची गोष्ट (आर्यन )

ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. माणूस जन्माला येतो पण त्याला माहीत नसते की, तो का जन्माला आला आहे. त्याच्या जन्माला येण्यामागचा नक्की काय उद्देश आहे? कुणीतरी असा म्हटलं देखील आहे, "प्रत्येक यशस्वी आणि अयशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.'' असाच काहीसं त्याचा ही जीवनात घडलं होत. मी आज तुम्हाला ज्याचा विषयी बोलणार आहे तो एक सर्वसामान्य तुमचा माझा सारखाच मुलगा आहे. याचा जीवनात अस काही घडलं त्याविषयी सविस्तर आज मी तुम्चाशी बोलणार आहे.


                  हा आर्यन ! आर्यन हा सर्वसामान्य कुटुंबातीलच तुमच्या माझा सारखाच एक मुलगा आहे. आर्यनचा जन्मापासूनच घरी दूरदर्शन आहे. ''तस म्हणायला हरकत नाही की त्याचा पाचवीलाच पुजला आहे. आर्यन चा मुळचा जन्म हा कोकणातील एका अस्कलीत खेड्यातील. अस्कलीत एवढ्यासाठीच म्हटलय कारण याचा गावात शाळा आहे पण पाचवी पर्यंतच एस टी येते पण गावातील रस्ते आज ही कच्चे,एस टी चा वेळा पण ठरलेल्या अशा गावात राहणारा हा आर्यन. आर्यन लहानपणापासूनच आपल्या आई- वडिलांपासून आपल्या आजीकडे राहत होता. आर्यनच गाव एकदम टिपिकल खेडच आहे. सर्वीकडे हिरवीगार झाडी आंबा, काजूचा बागा, घरापासून काहीशा अंतरावरून खळखळ वाहणार पाटाच पाणी....आर्यनच घर हे जुन्याकाळातल कौलारू घर ज्याचा भिंती दगड-गोट्यान  आणि शेण आणि लाल मातीन लीम्पलेल घर आहे. घर पाहायला खूप छानआहे. पाहिल्यावर अस वाटत की खरच कुठल्या तरी स्वर्गात आलोय. आर्यन शिक्षणाचा बाबतीत हुषार आहे. पण आर्यन मुळचा स्वप्नाळू त्यामुळे सतत स्वप्न पहात राहायची एवढंच माहीत.

                      आर्यन अडीच वर्षाचा असल्यापासून आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेला त्याला कधीच कुणाच प्रेम मिळाल नाही आणि कदाचित त्यामुळेच तो स्वप्नाळू झाला असावा. आर्यनला सतत वाटत राहायचं की आपल्याला कुणीतरी प्रेमान जवळ घ्याव, मायेन पाठीवरून हात फिरवावा पण अस करणार कोणीच न्हवत.आई-वडील भाऊ-बहिण मुंबईला राहतात. घरात टीव्ही  असल्यामुळे आर्यन सतत टीव्ही पहायचं तसा तो अभ्यास ही करत होता. पण त्याला काही करमणूक नसायची.आणि पुढे हीच सवय लागली. तेव्हा घरी दूरदर्शन चे एकच चॅनेल दिसत असल्यामुळे दर शुक्रवार,शनिवार हिंदी चित्रपट लागायचे ते घरातील सर्वजण पहायचे. आणि पुढे याचे परिणाम आर्यनचा मनावर झाले. कारण काय पहाव आणि काय पाहू नये हे सांगणार घरात कोणीच न्हवत. मला आपल्याला एवढच सुचवायचं आहे की मुलाना काय पाहायला द्यावे आणि काय देऊ नये हे मुळात पालकांनी ठरवायला हवे.

हा काळ १९९२ ते १९९९ चा होता.तेव्हा गावात फक्त आर्यनचा घरीच टीव्ही होता.त्यामुळे वाडीतले लोक शुक्रवार, शनिवार चे चित्रपट पाहायला रात्रीचे घरी येत असत. तेव्हा घर माणसांनी भरलेलं असायचं. तुम्हाला तर सांगायला नको हिंदी चित्रपट म्हटल्यावर त्यात काय असते ते....! आर्यन नेहमी चित्रपट पहायचा हे चित्रपट पहात असताना आर्यनचा मनावर ताबा घेतला तो त्याचा वेड्या स्वप्नांनी आर्यनला सतत वाटू लागले की आपली ही कोणीतरी अशी मैत्रीण असावी जी आपल्याशी बोलेल,प्रेमान जवळ घेईल.पण तेव्हा कोणी मैत्रीण त्याला तशी नाही भेटली. पण त्याचा वेड्या मनान पार झपाटून टाकल होत.

आजकाल आर्यन त्या प्रेमाचा विश्वात राहत होता. जस-जसा आर्यन पुढे शिकत शिकत मोठा होत गेला, हायस्कूलला गेल्यावर तर आर्यन खूपच बदलून गेला होता. सुंदर मुलगी दिसली तर आर्यन तिचा बद्दल स्वप्न पाहत होता. पौंगडावस्थेत मुलांना योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर मुल वाईट मार्गाला जाण्याचा वाटेवर असतात.

                        पुढे आर्यन जसा ९वी  १०वी मध्ये गेला त्याला नवीन मित्र मिळाले, आणि मित्रांचा संगतीने आर्यन अश्लील चित्रपट पाहू लागला, पुस्तकही वाचू लागला त्याला असा वाटायचं की हेच प्रेम आहे. पण आर्यनला अजून ही जाणीव न्हवती की तो ज्या मार्गावर चालाय तो चुकीचा मार्ग आहे, त्याला फक्त एवढच माहीत होत की आपली सुद्धा एक मैत्रीण असावी. आता त्याची थोडी स्वप्न देखील बदलली होती. आर्यन पुढे १०वी ला दोन विषयात नापास झाला. पुढे मुंबई ला येऊन नोकरी केली नोकरी करत तो १०वी पास झाला, अन १२वी उत्तीर्ण झाला तेही ६४% नी. पुन्हा आर्यन मुंबईला आई-वडिलांकडे आला आणि एका शॉपिंग मॉल मध्ये कामाला लागला. तिथे तर त्याचा लग्न झालेल्या स्त्रिया आणि मुलींशी संपर्क येऊ लागला आर्यनचा मनात आता आणखीनच वासना निर्माण होऊ लागली होती. आर्यनला आता अस वाटू लागले होते की प्रेम म्हणजे शरीर सुख! आर्यन आता तीच स्वप्न पाहत होता आता तो कुणाचा तरी शोधात होता. आर्यन जी स्वप्न पाहत होता ती त्याच्या भविष्यासाठी कधीच योग्य न्हवती. आणि मुळात त्याला याविषयी सांगणार आणि मनमोकळेपणाने बोलणार कोणीच न्हवत. आणि याच शोधात तो असताना नको तीकडे भरकटून गेला. असेच दिवसामागून दिवस जात होते आर्यन त्या दिवसाची वाट पहात होता. सहा-सात महिने गेले,आणि अखेर तो दिवस त्याचा जीवनात आला.आज त्याची खऱ्या अर्थाने  प्रतीक्षा संपली होती.

                        मला आज ही तो दिवस आठवतो आर्यन त्या दिवशी खूप खुश होता काम देखील मन लाऊन करत होता. आर्यनच काम होत आलेला माल चेक करणे. तो त्या दिवशी पण तेच काम करत होता तेव्हा त्याचे सर बोलले आर्यन जरा खाली जा आणि सिक्युरिटी पॉईंटला जाऊन स्टम्प घेऊन ये. आर्यन गेला खाली तेव्हा तिथे एक स्त्री उभी होती तिला सांगितलं की या बिलावर चेकचा ठप्पा मारा. अस बोलून गप्प राहिला तर त्या गार्ड महिलेने विचारले तुमचे नाव काय आर्यन लगेच उत्तरला आर्यन. आर्यन ने ही तिला विचारलं तुझा नाव काय तर ती लगेचच म्हणाली अश्विनी. तेव्हा तिथे आर्यन आणि अश्विनी शिवाय कोणीच न्हवत. अश्विनी बोलली माझा मुलाच नाव देखील आर्यन आहे.अस बोलून तिने लगेचच आर्यन चा मोबाईल नंबर घेतला आणि तिने तिचा ही नंबर आर्यनला दिला, आर्यनला क्षणात काय  झाले ते कळले नाही.आर्यन तसाच गोडाऊनला आला आणि आपल काम करू लागला. आर्यनचा मनात खूप विचार येत होते. संध्याकाळी आर्यन जेव्हा निघाला तेव्हा अश्विनी देखील भेटली दोघ सोबतच घरी निघाले होते. जाताना अश्विनी ने विचारलं तू नक्की काम काय करतोस तर तो म्हणाला मी माल चेकिंग काम करतो. बोलत असताना आर्यन ने अश्विनीला घाबरतच विचारले माझाशी मैत्री कराल का? अश्विनीला देखील तेच हव होत, तिने देखील लगेचच होकार दिला. तेव्हा अश्विनी आर्यनला बोलली माझा मुलाच नाव आर्यन आहे कारण माझा लग्नाआदी माझ एका मुलावर प्रेम होत त्याच नाव देखील आर्यन होत. आणि तू  देखील आर्यन. अश्विनी त्यांनंतर आर्यनला रोज कॉल करत होती मेसेज  देखील पाठवत असे. इथे आर्यनचा जीवनाला एक वेगळी दिशा आज मिळाली होती. आर्यनने अश्विनीला तीच आयुष्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली तीच लग्न झालय तिला दोन मुले आहेत. नवरा एका केमिकल कंपनी मध्ये काम करतो. घरी कोण कोण असत अस विचारल असता ती आणि तिची वर्षाची मुलगी असते. नवरा कामानिमित्तबाहेर असतो.

चार-पाच दिवस गेले आणि अश्विनी ने आर्यनला मेसेज केला आज कधी निघणार आहेस. मी सोबत येणार आहे. आर्यन ने लगेच रिप्लाय दिला सात वाजता निघेन तू पण तेव्हाच निघ. तिने देखील हो म्हणून उत्तर दिले. आज दोघांचा ही मनात काही वेगळेच चालू होते, हे दोघांचा ही लक्षात आले होते. आर्यन काम करत करत स्वप्नात बुडून गेला होता आज त्यला अस झाले होते की कधी एकदा सात वाजतायत आणि मी अश्विनीला भेटतोय. अखेर सात वाजता दोघही निघाले आणि नेहमीचा रस्त्यान चालले होते. ते पावसाचे दिवस होते. आणि तेव्हा मुसळधार पाउस  सुरु होता. पावसामुळे अंधार खूप झाला होता अश्विनीने विचारले तुला काही काम नाही आहे घरी. आर्यन ने उत्तर दिले नाही. आर्यनने देखील तेच विचारले तुझी मुलगी घरी एकटी आहे तर ती म्हणाली मी तिला पाळणा घरात ठेऊन येते, आज त्या बाईला बोलले  आहे की मला यायला एक दीडतास उशीर होईल. चालत चालत दोघ ही एका उद्यानात गेले तिथे पावसामुळे कोणीच न्हवते. दोघांना ही आज एकांत मिळाला होता. तिथल्या एका झाडाआड अंधारात दोघ ही जाऊन बसले होते. आर्यन तरी सुद्धा थोडा घाबरला होता तिला ते लक्षात आले तर तिने त्याला लगेचच जवळ घेतले. आज आर्यन खूप खुश होता. पाऊस देखील थोडा कमी झाला होता.आर्यन ला अश्विनीने विचारले तुझी कोणी मैत्रीण आहे का? आर्यन बोलला माझी कोणी मैत्रीण नाही तूच आहेस. अश्विनीने ब्यागेतून एक गुड्डे बिस्किटचा पुढा आणला होता तिने त्यातली बिस्कीट काढून दिले पण आर्यन घाबरला असल्यामुळे त्याने नकार दिला खाण्यास. अश्विनी समजून गेली होती की काय झाल ते. आर्यन एकीकडे आनंदी होता तर दुसरीकडे घाबरला देखील होता. अश्विनीने त्याच मन ओळखून त्याला लगेच मिठी मारली. अश्विनीने मिठी मारतच आर्यन ने देखील तिला घट्ट मिठी मारली आता दोघ ही एकमेकांचा बाहुपाशात जखडले गेले होते. अश्विनी ने तर त्याला स्वतःहून चुंबन घेणं सुरु केलं होत. आर्यनची इतक्या वर्षाची तपस्या फळाला आली होती अस म्हणायला हरकत नाही. कारण आज त्याला कोणीतरी प्रेमान जवळ घेतलं होत. तो आज खूप खुश होता. आज त्याच स्वप्न पूर्ण झाल होत.

            आता हे रोजच झाल होत,आर्यनला ठाऊक न्हवते पुढे काय घडणार होते ते. आर्यन ने एक दिवस विचारले तुझ लग्न झालेलं असताना देखील तू माझाशी मैत्री का केलीस? तेव्हा अश्विनी खोटच बोलली की आर्यन माझा हृदयला होल आहे.मला वर्षातून एक वेळ रक्त बदलाव लागत. आणि त्यामुळे माझा नवरा माझाशी संबंध ठेवायला मागत नाही.मला ही कुणाची तरी गरज होती आणि तू मला भेटलास, अश्विनी कसला ही विचार करता लगेच आर्यन ला म्हणाली आर्यन आपण उद्या शरीर सुखाचा उपभोग घेऊया का? आता आर्यन ही पूर्ण घाबरला होता. आर्यन आज खूप अस्वस्थ झाला होता, की मी जे काही वागलो ते चुकीच तर नाही ना? आर्यन पूर्ण गोंधळला होता. त्याला आज काहीच सुचत न्हवते. तो पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. आर्यनचा मनात खूप विचार येत होते, मी वागतोय हे चुकीच तर नाही ना? शरीरसुख हेच प्रेम असत का? असे अनेक विचार आज मनात येत होते. आर्यन पूर्ण गोंधळून गेला होता. त्याला आज जेवण देखील गेले नाही.आर्यनला सारख वाटत होत की मी माझा सुखासाठी एका स्त्री चा संसार तर उध्वस्त तर नाही ना करत आहे. अश्विनीचा नवरा हा खरच देव माणूस असावा कारण त्याला अश्विनीची खूप काळजी आहे. नाहीतर कुठला पुरुष आपल्या पत्नीला शरीर सुखापासून वंचित ठेवेल. ज्यामुळे जीव जाणार असेल तर काय उपयोग असल्या सुखाचा असा विचार तिचा नवऱ्याने केला असावा. आज जर मी माझा सुखासाठी तिचा उपयोग केला आणि तीच काही बर वाईट झाल तर त्याला कोण जबाबदार राहणार..? असे विचार त्याचा मनात येत होते.     आणि त्यामुळे आर्यन खूप बेचैन झाला होता.

                       आर्यन दुसऱ्या दिवशी कामाला गेला पण आज तो खूप उदास होता. आज तो अश्विनीशी काहीच बोलला नाही. आर्यन ने आज खऱ्या अर्थाने विचार केला होता की शरीर सुख हे प्रेम मुळात असूच शकत नाही. कारण प्रेमाची व्याख्या वासना असूच शकत नाही. आर्यन त्या दिवशी तिला भेटलाच नाही, कारण आज त्याचा मनात प्रेमाविषयी काही वेगळी भावना निर्माण झाली होती. आर्यनच स्पष्ट मत झाल होत की प्रेम म्हणजे वासना असूच शकत नाही. आणि ज्या प्रेमात वासना आहे ते प्रेम कधी होऊच शकत नाही. त्यादिवशी आर्यन एकटाच घरी निघून आला. अश्विनीने त्याला मेसेज केला होता की उद्या सुट्टी घे, आपण माझा मैत्रिणीकडे जाऊया. त्याने हो म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी तिचा सोबत तो तिचा मैत्रिणीकडे जायला निघाला पण ती त्याला बदलापूरला घेऊन गेली बदलापूरला एक मंदिर आहे टेकडीवर त्या टेकडीवर दोघ गेले अश्विनी त्याला म्हणाली की थांबूया इथेच. पण आर्यन ने नका दिला. त्याला तीच वागण पटत न्हवते. तो तिथून चालू लागला, तेवढ्यात पोलिस तिथ आले. त्यांनी विचारले तुम्ही इथे काय करत आहात. आर्यन खूप घाबरला होता पण तेवढ्यात तो म्हणाला वरती मंदिरात आलो होतो आम्ही. पोलिसांनी विचारले कुठून आलात तर उत्तर दिले आम्ही ठाण्याहून आलोय. तेव्हा ते बोलले ही कोण? आर्यन आता पूर्ण गोंधळला होता इतक्यात अश्विनीचा गळ्यात मंगळसूत्र पाहून लगेच म्हणाला की माझी पत्नी आहे. पोलिस लगेच बोलले इथे थांबू नका इकडे चोऱ्या होतात तेव्हा लगेच निघून स्टेशनला जा......!  दोघ ही स्टेशनला निघून आले. आणि तिथून लगेच अश्विनी आर्यनला घेऊन कल्याणला गेली. तिची मैत्रीण सुलतानाला भेटली. सुलतानाचा नवरा काही वर्षापूर्वीच वारला होता तिचा घरी तिचा सावत्र मुलगा आणि ती राहत होते. सुलताना अश्विनीला बोलली होती तुला कधी एकांत हवा असेल तेव्हा तू माझा घरी ये! आणि म्हणुनच अश्विनी आर्यनला घेऊन तिथे आली होती, आर्यनचा जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो तिथून लगेच निघून आला, कारण आता त्याला अश्विनीच वागण पटत न्हवत. आर्यन तिथून घरी निघून आला आणि त्याने खूप विचार केला आणि शेवटी त्याने तिला न भेटण्याचा निर्णय घेतला की मी माझा स्वार्थासाठी कोणाचा भावनाशी खेळू शकत नाही. आणि शरीर सुख हे कधीच प्रेम असू शकत नाही, त्यादिवशी  आर्यन खऱ्या अर्थाने बदलला होता. त्याने त्या दिवसापासून अश्विनीचा संपर्क तोडला. तिला त्याने स्पष्ट नकार दिला. आता आर्यन एका अशा व्यक्तीचा शोधत आहे जी त्याचावर मनापासून खर प्रेम करेल. त्याला एवढच माहीत आहे की, "प्रेम म्हणजे वासना नाही. तर प्रेम म्हणजे एक भावना आहे. जी समजायची असते, अनुभवायचं असत ते फक्त नात, प्रेम म्हणजे जिव्हाळा, आपुलकी, विश्वास म्हणजे प्रेम..." आर्यन ने फक्त आज नकार दिला होता तो तिचा सुखाचा आणि भविष्याचा विचार करून. कारण त्याला सतत वाटत होत की तिचा संसार उध्वस्त होऊ नये. आणि  म्हणूनच त्याने तिला नकार दिला होता.

                 मला आज ही अश्विनी बद्दल काही गोष्टी ऐकायला मिळतात, की ती दुसऱ्या पर-पुरुषासोबत फिरत असते. तिला कसला ही त्रास न्हवता ती आर्यनशी खोट बोलली होती. तिला सुरुवातीपासूनच परपुरुषाचा नाद होता म्हणूनच ती तशी वागत असावी.राहून-राहून मला एकच प्रश्न पडतो तो असा की अश्विनीने सांगितलेलं आर्यनला ते सत्य होते की आज लोक बोलतात ते सत्य आहे. असो! मला आज समाधान यातच आहे कि आर्यन या वासनेच्या मोहजालातून बाहेर पडला. जर हि गोष्ट सत्य असेल तर मला त्याचा अभिमान आहे. पण जर पुन्हा तो त्यात गुरफटला गेला  तर एका चांगल्या मुलाच जीवन उध्वस्त झालेलं पहावणार नाही.  

                  मित्रानो आज आर्यन सारखी अशी हजारो मुल पहावयास मिळतील जी शरीरसुखाच्या वियोगाने ग्रासली गेली आहेत. आणि अशा मुलांना खरच योग्य वयात योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अन्यथा आज हि तरुण पिढी जे देशाच या उज्वल भविष्य आहे ते नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आणि हे कारण आहे, जे आज महिलांवर आणि अल्पवयीन तसेच तरुण मुलींवर अत्याचार होत आहेत. कारण सगळेच आर्यन असू शकत नाहीत जे स्त्रियांचा मनाचा विचार करू शकतील. तेव्हा मला आपल्याला एवढच सांगायच आहे खास करून त्या पालकांना ज्यांचं आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष्य नाही आहे." मुलांना स्वातंत्र्य द्या पण ते स्वातंत्र्य देत असताना आपली मुल बाहेरील जगात काय करत आहेत कस वागत आहेत हे आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायला विसरू नका" कारण जर आपले लक्ष्य असेल तर निशितच आज-काल जे अत्याचार होतायत ते नक्कीच कमी होतील.


                                                                                धन्यवाद !

                                                                                                  


                                                                                         लेखन : सं. प्र. चव्हाण